मलकापूर दि.०९ एप्रिल
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९६ व्या जयंती निमित्त दि ११ एप्रिल २०२३ मंगळवार रोजी सप्त खंजेरी वादक श्री संदीप पाल महाराज यांच्या प्रबोधनपर किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील बहुजन उद्धरक सेवा समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती सर्वसमावेशक पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने दरवर्षी विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यात मागील काळात अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तर यंदाच्या वर्षी सुप्रसिद्ध सप्त खंजेरी वादक श्री. सत्यपाल महाराज यांचे शिष्य श्री. संदीप पाल महाराज यांच्या समाजप्रबोधनपर किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला असल्यची माहिती आयोजन समितीचे प्रा. डॉ. नितीन भुजबळ यांनी दिली.
हा कार्यक्रम दि. ११ एप्रिल २०२३ मंगळवार रोजी स्वामी विवेकानंद आश्रम, महाकाली नगर मलकापूर येथे सायंकाळी ७ वाजता सर्वसमावेशक पद्धतीने संपन्न होणार आहे. म्हणून त्यानिमित्ताने थोर समाजसुधारक, शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवनारे विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचर व कार्याला उजाळा देत त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित या जयंती सोहळ्यासाठी सर्वांनी सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. त्यात संतोष बोंबटकार, श्याम वानखेडे सर, संजय उमाळे सर, विश्वंभर तायडे, किशोर राऊत, वैभव भोपळे, मंगेश सातव, दिपक बावस्कर, उमेश राऊत, बंडू बोंबटकार, सुर्यकांत उंबरकर, सागर सातव, सुपेश बोंबटकार आदिंसह अनेकांचा सहभाग आहे.