Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजन

  


    नांदुरा तालुक्यातील ग्राम: वडनेर भोलजी  येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 14 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता गावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्राची भव्य मिरवणूक काढून 17 एप्रिल रोजी समाज प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सत्यपाल महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी  वडनेर भोलजी पंचक्रोशीतील जनतेने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.  मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश भाऊ ऐकडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ चौकसे  यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले. नंतर सत्यपाल महाराजांनी आपल्या कीर्तनात सुरुवात केली. सत्यपाल महाराज म्हणाले बाबासाहेबांच्या महान कार्यामुळेच आपला देश व आपल्या वंचित समाजाची उन्नती झाली. म्हणून समाजाने बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचल्यापेक्षा डोक्यात घेऊन नाचावे असे आव्हान सत्यपाल महाराजांनी उपस्थित जनतेला केले. 

    समाजातील वाढती अंधश्रद्धा, बुवाबाजी ,भ्रष्टाचार , आणि कर्मकांडावर सत्यपाल महाराजांनी कडाडून टीका केली. तर तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे भावनिक आव्हान केले. बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, फुले ,शाहू ,आंबेडकर आशा महामानवाच्या घोषणासह त्यांची उदाहरण देऊन खंजिरी वाजवून उपस्थित जनतेचे प्रबोधनासह चांगलेच मनोरंजन केले. पोलीस शिपाई ,सैनिकांच्या मातेचा शाल पुष्पगुच्छ साडीचोळी देऊन स्टेजवर महाराजांनी सत्कारही केला. समाजाने  विधवा महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी  असे सांगून अनेक विधवा महिलांचा साडीचोळी देऊन सत्यपाल महाराजांनी सन्मान राखत सत्कारही केला. वाचाल तर वाचाल ...या विचाराप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांसह अनेकांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता भेट दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान इंगळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश इंगळे, मंगेश इंगळे ,भागवत दाभाडे ,निंबाजी इंगळे, सुभाष इंगळे, अरविंद इंगळे, विनोद इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.