मलकापूर खामखेड शिवारात अप-डाऊन ट्रॅकच्यामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. दरम्यान आढळून इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहेयाबाबत अधिक माहिती अशी की, खामखेड शिवारात अप-डाऊन ट्रॅकच्या मध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती ट्रॅकमन किशोर वराडे यांनी स्टेशन मास्टर आरती शेगोकार यांना दिली. रेल्वे पोलिसांकडे करण्यात आले.
त्यावरून मलकापूर ग्रामीण त्यानंतर याबाबतची फिर्याद पोलिसांनी मर्ग १६ / २३ दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोउपनि कुणाल जाधव करीत आहेत. तर सदर मृतकाची ओळख पटविण्याचे आवाहन मलकापूर ग्रामीण पोलिसांनी केले आहे.