वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाघुड तालुका मलकापूर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती अनुषंगाने 12 व 13 एप्रिल रोजी दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेया सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घघाटन वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख अतिथी म्हणून तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे ता.उपाध्यक्ष विलास तायडे, प्रवीण इंगळे, सरपंच मंदाताई गजानन तायडे, माजी सरपंच सचिन तायडे हे उपस्थित होते
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन माल्यार्पन करण्यात आले तसेच अतिशभाई खराटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले
या सांस्कृतिक कार्यक्रमात बुद्ध भीम गीत गायन, भाषण, नृत्य यामध्ये मुला मुलींनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला तसेच उपस्थित शाहीर, कलावंतांनी शाहिरी जलसा सादर केला याप्रसंगी आंबेडकरी चळवळीत अनमोल योगदान देणारे गावातील ज्येष्ठ नागरिक भीमराव लोखंडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला
या उत्साह पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वंचितचे ता.उपाध्यक्ष विलास तायडे, सुपडाजी ब्राह्मणे,अनिल तायडे, के. पी. सुरवाडे यांनी केले यावेळी गावातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी गौतम तायडे, राहुल दे.तायडे, राहुल भ.तायडे, क्रिष्णा वानखेडे, अमोल खराटे, राहुल भिडे, गोपाल तायडे, सौरव तायडे, शिवा तायडे, प्रवीण तायडे आदींनी परिश्रम घेतले