Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पोषण आहारामध्ये भरड धाण्याचा जास्तीत जास्त वापर करा--पांचाळ

  


मलकापूर 

पोषण आहारामध्ये भरड धान्याचा जास्तीत जास्त वापर करा तसेच भरड धान्यापासून बनविण्यात येणाऱ्या विविध पाककृती तसेच धान्यातून बालकांना पोषण आहार मिळते याविषयीचे सखोल मार्गदर्शक बाल विकास प्रकल्प अधिकारी पांचाळ मॅडम यांनी अंगणवाडी सेविका यांना मार्गदर्शन केलेआहे.

भीमनगर येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे   आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून अंगणवाडी सेविका व मदतनीस  यांचे शिबिर आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प बुलढाणा चे अंतर्गत पोषण पखवाडा कार्यक्रमाचे आयोजन बाल विकास प्रकल्प अधिकारी पांचाळ होते तर अन्न व औषध प्राशन सहाय्यक आयुक्त केदारे सर मुख्य सेविका पाचपोळ यांनी अंगणवाडी शिक्षिका सेविका मदतनीस यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.

या प्रसंगी सर्व सेविका व मदतनीस यांनी भरडधारणापासून बनवून आणलेले विविध पाककृतीची प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन राजकन्या शेगोकार सेविका,अनिता इंगळे सेविका, शुभांगी पाचपांडे सेविका,गीता घोंगलिया मदतनीस, शमशाद खान म शे आयुब मदतनीस शारदा इंगळे आदी सर्व सेविका व मदतनीस उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता ढापणे यांनी केले तर आभार प्रदर्शन माधुरी खांदे यांनी केले आहे.