नांदुरा : प्रतिनिधी
तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायतचे सचिव यांनी ग्रामपंचायत अभिलेखात खोडतोड प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत शासन निर्णय व परिपत्रक यांना केराची टोपली दाखवली आहे, त्याबद्दल कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्रीकृष्ण हिवाळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,
काटी येथिल श्रीकृष्ण हिवाळे यांची राहती जागा क्रं. २०७ त्यापैकी ग्रामपंचायत नमुना ८ वरील अभिलेखात तत्कालीन सचिवाने कुठलाही ग्रामपंचायत ठराव न घेता माझ्या मालकीची १६.३२ अशी ५१२ चौरस फूट जागेपैकी गोपाळ हरीभाऊ हिवाळे यास १३,२३ अशी २९९ चौरस फूट जागा कुठलाही ग्रामपंचायत ठराव न घेता नोंद घेण्यात आली. याबाबत २० फेब्रुवारी रोजी शासन आदेश व परीपत्रक अनुसार ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला, असता संबंधित सचिवाने कुठलाही निर्णय तसेच नोंदणीचा अर्ज ग्रामपंचायत सभेत ठेवला नाही त्यावर कुठलीही कारवाई केली नाही, त्यामुळे संबंधित सचिवाने त्यांचे कर्तव्यात कसूर करून संबंधित ग्रामपंचायत अभिलेखाबाबत खोटी माहिती संबंधित इसमाला दिल्याने सदर इसमाने माझ्या विरोधात दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला आहे,
तरी संबंधित सचिवावर तात्काळ कर्तव्यात कसूर करणे, ग्रामपंचायत अभिलेखात खोड तोड करणे, चुकीचे अभिलेख वाटप करणे आदी प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे, याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास २७ मार्च पासून विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे आमरण उपोषणाचा इशारा श्रीकृष्ण हिवाळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.