Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बँकेची तक्रार केल्यामुळे तक्रार कर्त्याना धमक्याची फोन

 


नांदुरा/प्रतिनिधी

       नांदूर अर्बन बँकेची भ्रष्टाचाराची चौकशी फिरते पथकामार्फत सुरू झाली आहे, त्यामुळे तक्रार कर्ते  किशोर आत्माराम इंगळे यांना धमक्यांची फोन व तक्रार परत घेण्यासाठी दबाव येत आहे, वृत्त असे की जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुलढाणा येथे दिनांक, 13/03/2023 रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे,

      सविस्तर असे की नांदुरा अर्बन बँकेत मोठ्या प्रमाणावर बोगस कर्ज वाटप ,नातेवाईक व जवळच्या व्यक्तींची नोकर भरती, बोगस बिले काढणे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र प्रसाद पांडे यांची सभासदाशी गैरवर्तणूक,माहिती न देणे व मग्रुरी तसेच बँकेच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊ दिल्यामुळे बँकेतून मुदतपूर्व ठेवी काढणे इतर मुळे झालेले बँकेचे नुकसान या व इतर बाबी निदर्शनास आले आहे, 

        वरील सर्व मुद्द्यांची चौकशी फिरते पथक बुलढाणा यांच्या मार्फत सुरू झाली आहे, त्यामुळे तक्रार कर्ते यांना धमक्याची फोनवर तक्रार परत घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे, या संबंधीची तक्रार किशोर इंगळे यांनी जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा,जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा व पोलीस निरीक्षक नांदुरा यांना दिलेल्या आहेत,