Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संताजी नवयुती महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिवस, थाटामाटात साजरा

 


    8 मार्च, जागतिक महिला दिनानिमित्ताने संताजी नवयुवती, महिला मंडळातर्फे कार्यक्रम सोहळा तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचा मुख्य हेतू, समाजातील सर्व महिलांनी एकत्र येऊन महिला शक्तीचा सन्मान तसेच भारतात जन्मास आलेल्या सर्व वीरांगणा व स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महिलांना आदरांजली देणे होता.

         सदर कार्यक्रमात, रांगोळी स्पर्धा, थाळी सजावट व संगीत खुर्ची इत्यादी विविध कार्यक्रमांचे आयोजन नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांच्यासह समाजातील वरिष्ठ सौ. सुमनबाई आकोटकर, सौ निर्मला डवले, सौ सुमनबाई जामोदे, सौ सुमित्राबाई बोराखेडे, सौ सुमनबाई जावरे यांची उपस्थिती लाभली. प्रमुख उपस्थित आमच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. 


             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रीती नाये (पहाडे) तसेच आभार प्रदर्शन सौ. शीतल आकोटकार  यांच्याद्वारे करण्यात आले कार्यक्रमाचे सर्व नियोजन संताजी नवयुती महिला मंडळातर्फे करण्यात आले सदर कार्यक्रमास समाजातील सर्व महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

    महिला दिनाच्या निमित्त महिलांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपला सहभाग जसा नोंदवला तसा जीवनातील प्रत्येक स्पर्धेमध्ये महिलांनी पुढे यावे. मनातील भीती काढून आत्मविश्वासाने आज प्रत्येक क्षेत्रात शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, विज्ञान, तंत्रज्ञान, इतकेच नव्हे तर देशाच्या संरक्षण खात्यात ही महिला चांगल्या पदावर मोठ्या कामगिरी करताना दिसून येतात . आपणही अशाच प्रकारे स्वतःच्या कर्तुत्वाने आपल्या व आपल्या कुटुंबाला प्रगतीपथावर नेले पाहिजे .-धनश्रीताई काटीकर पाटील  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  हिंदी मराठी पत्रकार संघ