प्रतिनिधी सचिन सुतार
गोकुळ शिरगाव दि. 4 मार्च येथील जिल्हा परिषद शाळा नं.-2 वार्षीक स्नेहसंमेलन शाळेच्या मैदानावर असा एक दिवसाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या आकर्षक प्रस्तुती करण्या- साठी प्रसिद्ध असलेल्या या महोत्सवाने रसि- कांचे मन जिंकून घेतले. विद्यार्थानी विविध कार्यक्रम सादर करून आपने कलागुण व कौशल्य सर्वासमोर सादर केले
दि. 4 मार्च पार पडलेल्या या महोत्सवाची "सुरुवात 'एकदा' या एकांकीने झाली. त्यानंतर मुलांनी नृत्य व गायन सादर केले या बहारदर नृत्यांनी व गाण्यांनी सर्वानांच माना डोलवाला डोलवायला लावल्या. शेवटी "सर्वधर्म संभाव' या नाटकातून देव सर्वाचा एकच आहे असा संदेश या नाटकातून मुलांनी सर्वाना दाखवून दिले,या कार्यक्रमास उपस्थित मा .मुख्याधीपीका देसाई मॅडम , गावचे लोकनियुक्त सरपंच मा. डावरे साहेब तसेच सर्व ग्रामस्थ व सर्व पालक इतर मान्यवर होते.