Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजपूत समाजाचे जीवनमान उंचवण्यासाठी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी

  


मलकापूर

राजपूत समाजाची आर्थिक स्थिती उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगार, उद्योगधंदे यासाठी राजपूत समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी सकल राजपूत समाज मलकापूरच्या वतीने आज ३१ मार्च रोजी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,  राजपूत समाज हा दुसर्‍याच्या सुखा दुखात साथ देणारा, अन्यायाविरुध्द नेहमी आवाज उठवणारा क्षत्रिय राजपूत समाज आहे. महाराष्ट्रात एकूण २१ टक्के लोकसंख्या राजपूत समाजी असून अनेक मतदार संघासाठी निर्णयक भूमिका घेऊ शकतात. आज आर्थिक स्थिती उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगार उद्योगधंदे यासाठी राजपूत समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ करून त्यासाठी आर्थिक तरतूद करून स्थापनेची घोषणा करावी ही सर्व राजपूत समाजाची भावना आहे.

राजपूत समाज १९९३ पासून आर्थिक विकास महामंडळाची मागणी सातत्याने करत आहे. तरी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री यांचे सोबत चर्चा केल्यावर त्यांनी अतिरीक्त मुख्य सचिव यांना सादर करण्यास निर्देश केले होते. मात्र अद्यापही कार्यवाही प्रलंबित आहे. तरी सदर निवेदन शासनाकडे पाठवण्यात यावे व या मागणीला गांभीर्याने व सर्व समाजाच्या विकास व्हावा या भावनेने विचार करावा, अशी मागणी सर्व राजपूत समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली.

निवेदन देतेवेळी संदीपसिंह राजपूत, दिनेशसिंह गौर, पवनसिंह गौर, विजयसिंह गौर, नरेशसिंह भदोरीया, जयपालसिंह राजपूत, बजरंगसिंह राजपूत, पी.डी.राजपूत, जसवंतसिंह राज्पूत, बी.के.गौर, रामसिंह राजपूत, चंदनसिंह राजपूत, कुलवंतसिंह राजपूत, अनिल हिंगे, डी.व्ही.ठाकूर, अतुलसिंह राजपूत, विरसिंह राजपूत, हरपालसिंह राजपूत, करण राजपूत आदी समाज बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.