मलकापूर :- जगण्याची भ्रांत हरविणारा आणि सर्वसामान्यांना देशोधडीला लावणारा पत्त्यांचा जुगार ( क्लब ) मलकापूर शहरात राजरोसपणे सुरू असून याकडे संबंधित अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. चोरट्या मार्गाने चालणारा हा पत्त्याचा ( क्लब ) जुगार आता शहरातील मुक्ताईनगर रोड वर पाहायला मिळत आहे..
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात पत्त्याचा ( क्लब ) जुगाराचा अवैध धंदा सुरू आहे दिवसागणिक या मार्गाच्या व्यवसायाची उलाढाल वाढत चालली आहे़ काही दिवसांपूर्वी शहरातील मोजक्याच ठिकाणी आडोशाला सुरू असलेला हा धंदा आता मुक्ताईनगर रोडवर खुलेआम सुरू आहे. मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्यांच्याकडून मलकापूर वासियांना अवैध धंद्यांवर आता तरी आळा बसेल अशी अपेक्षा होती मात्र तसे दिसून येत नाहीये..
मलकापूर शहरांमध्ये खुलेआम हा अवैधरित्या क्लब जुगार सुरू असून याकडे पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे यावर प्रश्नचिन्ह देखील निर्माण होत आहे. मलकापूर शहरामध्ये खुलेआम चालणारा हा पत्याचा क्लब रात्रंदिवस सुरू असून यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत आहे यामुळे त्या ठिकाणी एके दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.