मलकापूर(28-03-2023)
आज दिनांक 28-03-2023 रोजी मलकापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री एस. ए. कुलकर्णी यांनी पॅनेशियन इम्पेक्स विरूद्ध मुकेश ऑइल इंडस्ट्रीज या प्रकरण क्र 390/2014 या प्रकरणात आरोपी मुकेश एस. पुरोहित यास दोषी धरून यास चेक रक्कमे वर 9℅ व्याज दराने व्याजासह चेकची रक्कम परत करण्याचे आदेश दिले व सदर रक्कम ही नुकसान भरपाई म्हणून फिर्यादि कंपनी पॅनेशियन इम्पकस प्रा.लि.या कंपनीस देण्याचे आदेश दिले आहेत.
प्रकारणाची थोडक्यात हकीकत अशी आहे कि फिर्यादि कंपनी ही रजिस्टर्ड कंपनी असून सदर कंपनीचे कार्यालय कलकत्ता येथे आहे तसेच कंपनी ही मलकापुर येथे कपासाचे गाठाणी बनविण्याचा व्यवसाय करते तसेच सरकी विक्री चा व्यवसाय करते. आरोपी मुकेश ऑईल इंडस्ट्रीज खामगांव याचा प्रोपराइटर असून आरोपी फिर्यादि कंपनी कडून सन 2014 मध्ये वेळोवेळी उधारीवर सरकीचा माल खरेदी केला होता.तसेच सदर उधारीचे परतफेडी करिता फिर्यादि कंपनीस चेक दिला होता. सदर चेक अनादारित झाल्यानंतर फिर्यादि कंपनीने आरोपिस मलकापुर येथील अॅड जी. डी. पाटिल यांचे मार्फ़त नोटिस देवून चेकची रक्कम परत करण्याविषयी कळविले होते परंतु आरोपीने मुदतीचे आत चेकची रक्कम परत न केल्यामुळे मलकापूर येथील न्यायालयात कलम 138 नि. ई. ऍक्ट नुसार प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात पुराव्या अंती तथा दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर फिर्यादि कंपनी तर्फे अॅड जी. डी. पाटिल मलकापुर यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून आरोपिस धनादेशचा रक्कमेवर 9℅ व्याज दराने दंड ठोठावून संपुर्ण रक्कम रु 11,72,658/- एवढा दंड ठोठावला व सदर रक्कम ही फिर्यादिस नुकसान भरपाई म्हणुन देण्याचा आदेश आज न्यायालयाने दिला आहे फिर्यादि तर्फे अॅड जी. डी पाटिल यांनी काम पहिले.