बुलढाणा: जिल्ह्यांमधील अपघाताची संख्या वाढत चालली आहे. आज २४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास मेहकर खामगांव मार्गावरील जानेफळ नजीकच्या समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघातात २४ जण जखमी झाल्याचे माहिती समोर आली आहे. त्यातील तिन व्यक्ती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मेहकर डिपोची बस एम.एच. १४ बिटी ४५४३ हि शेगांव कडून मेहकरच्या दिशेने जात होती. बस ने टिप्परला मागून धडक दिली. अपघातात बसचा पुढील भाग चेंदामेंदा झाला. अपघातातील जखमींना मेहकरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.