फरार आरोपींना पकडण्यााठी पोलीस विभागाने २७ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान राबविलेल्या माहिमेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. आज, १६ मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. जिल्ह्यात फरार आरोपी , फेरअटक आरोपी, बंदी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने २७ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
या मोहिमेदरम्यान मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय पढार, पोलीस कॉस्टेबल आनंद माने, शेख आसीफ, गोपाळ इंगळे,प्रमोद राठोड यांनी ठाणेदार अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनात उल्लेखनीय कामगिरी फरार आरोपींना अटक केली. जिल्ह्यातील एकूण फरार आरोपींची संख्याही कमी झाली आहे. त्यांच्या याकार्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी बुलढाणा येथे आयोजित पोलीस विभागाच्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. भविष्यातही असेच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावून महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकावी, अशी अपेक्षा आव्हाड यांनी व्यक्त केली.