नितेश केराम
अंशदायी पेन्शन योजना रद्ध करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणी साठी मंगळवार पासून शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महानगर पालिका नगर परिषद नगर पंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी समनव्य समितीच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला या अनुषंगाने संपाचा दुसऱ्या दिवशी म्हणेच बुधवारी हि कोरपना तालुक्यातील कर्मचाऱ्यानी बेमुदत संपात सक्रिया सहभाग नोंदवला या संपा त कोरपना तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यलयीन कर्मचारी शिक्षक भूमी अभिलेख महसूल कृषी बांधकाम आरोग्य व आदी कार्यलयातील कर्मचारी उपस्थित होते