बातमी प्रकाशित करून व्यायामशाळेच्या गैर वापरासंधार्भात लिखाण केले म्हणून पत्रकार अजय टप यांना जीवे मारण्या ची धमकी देणाऱ्या आरोपीना अटक करून पत्रकार सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार मलकापूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना एका निवेदन द्वारे केली .
या निवेदनात म्हंटले आहे कि मलकापूर येथील पत्रकार अजय टप यांनी मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी गावातील व्यायाम शाळा गैरवापराबद्दल बातमी प्रकाशित केल्याचा व त्या संधर्भात तक्रार अर्ज केल्याचा आकस धरून त्यांना दि २८-०२-२०२३ रोजी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली . यामुळे अजय टप यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे .
सदरचा घटना लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर हल्ला असून अशाप्रकारे पत्रकारांना धमकावने व लेखनीची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे अशा गुंडप्रवृत्तीच्या व दादागिरी करण्याचा प्रकार करणाऱ्या आरोपींवर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करण्यात येवून त्यांना अटक करण्यात यावी व कठोर शिक्षा व्हावी. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर त्वरित कारवाई करून प्रतिबंध करणे गरजेचे आहे. तरी मेहरबान साहेबांनी सदर निवेदनावर लक्ष देऊन गुंडांना कारवाई करून जेरबंद करावे अन्यथा हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्यातर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल. असा इशारा यावेळी धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ यांनी दिला. या निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष उल्हास भाई शेगोकार, विदर्भ समन्वयक श्रीकृष्ण तायडे , विदर्भ सचिव सतीश दांडगे, जिल्हा अध्यक्ष गौरव खरे, शहराध्यक्ष शेख जमील पत्रकार , विनायक तळेकर, भाई राजेश इंगळे, योगेश सोनवणे, धर्मेशसिंह राजपूत, प्रदीप इंगळे , सय्यद ताहेर, बळीराम बावस्कर, पंकज मोरे, निलेश चोपडे , अजित फुंदे, मयूर लड्डा ,सतीश वडाळे इत्यादी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षरी आहे.