मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील 27 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महात्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील शुभम वसंता भारंबे वय 27 वर्ष याने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महात्या केली आहे.. सदर घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे शवविच्छेदानाकरिता पाठविला. युवकाने आत्महत्या का केली अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक एफ. सी मिर्झ यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहे.