मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा येथील 24 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद 16 मार्च रोजी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. जांभूळ धाबा येथील अनिता माणिकराव सोनोने चोवीस वर्षीय युवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठे आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याचीनोंद मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.