नांदुरा तालुक्यातील डीघी येथील 22 वर्षीय रेणुका संजय लांडे युवती बेपत्ता झाल्याची नोंद 19 मार्च रोजी नांदुरा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. डीघी येथील 22 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद नांदुरा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.