मलकापूरः
सहकारी पतपेढया करिता आयोजित अॅडव्हॉन्टेज "बॅको ब्लु रिबन" 2022 पुरस्कार स्पर्धेत महेश अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी म.मलकापूर ला 35 कोटी ते 50 कोटी डिपॉझिट गटात उत्कृष्ट व्यवस्थापन गोथरेट, सतत प्रगती, वसुली इ. बददल प्रथम पुरस्कार मिळाला. बॅको पुरस्कार गत 9 वर्षापासून बँकात स्पर्धा घेउन वितरीत होत होते सलग नवव्यांदा सहकारी पतसंस्था करिता स्पर्धेचे आयोजन केले होते. संस्थेच्या व्यवस्थापन, आर्थिक प्रबंधन वगैरे सर्व बाबतीत निकष लाउन स्पर्धेचे निकाल घोषित झाले व यांत महेश अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी म.मलकापूरला प्रथम पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार संस्थेला नवव्यांदा मिळत आहे.
पारितोषिक वितरण सोहळा एव्हरशाईन प्रायमा हॉटेल महाबळेश्वर येथे संपन्न झाला. कार्यक्रमात मा. श्री. शरद गांगल, अध्यक्ष ठाणे जनता सहकारी बँक लि.ठाणे यांचे हस्ते, बॅकोचे श्री अविनाशजी शिंत्रे-गुंडाळे व गॅलेक्सी इन्मा सिस्टीम पुणेचे, अशोक नाईक यांच्या उपस्थितीत महेश अर्बन पतसंस्थेचे व्यवस्थापक सुनिल अग्रवाल, लेखापाल परमानंद व्यास वसुलीअधिकारी सदाशिव मोगरे याना देण्यात आला. महाराष्ट्रातील विविध संस्थाचे प्रतिनिधी कार्यक्रमात उपस्थित होते. सदर कार्यक्रमांत 2 दिवसाचे राज्यस्तरिय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पतसंस्था संबंधीत विविध योजनांचे महत्वपुर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.