मलकापूर -
संरक्षण दलात भरती करिता तयारी करिता असलेल्या महिला तसेच विविध स्पर्धांच्या पूर्वतयारी करीत असलेल्या विद्यार्थिनींना शहरातील तालुका संकुल क्रीडांगण परिसरात होत असलेल्या छेडखानीच्या प्रकारावर आळा बसविण्या करिता प्रशासनाने सक्रिय होऊन विविध उपायोजना कराव्या व अशा चिडीमार लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी विश्व हिंदू परिषद तर्फे उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शहरातील छत्रपती शिवाजी नगर लगत असलेल्या तालुका क्रीडा संकूल येथे दररोज पोलीस भरती व इतर शासकीय भरती करिता रानिंग ,गोळा फेक, लांब उडी, सारखे इतर सराव करण्यासाठी महिला व मुली येतात. दरम्यान मागील काही दिवसापासुन शहरातील काही टवाळखोर मुले क्रिडांगनावर येऊन लज्जेस धक्का पोहोचेल अशा नजरेने हावभाव करीत त्रास देत असतात. धावण्याचा सराव करीत असतांना जाणून बुजुन टॉटिंग करतात. महिला व मूली धावण्याचा सराव करते वेळी त्यांच्या जवळ जाऊन क्रिकेट खेळतात. अशा विविध नाहक त्रास देण्याच्या प्रकारामुळे या महिला व मुली मध्ये एक भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
महिला व विद्यार्थिनींना होत असलेल्या चुकीच्या वागणूकी मुळे शहरातील शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने शासनाने सक्रियता दाखवावी. क्रिडा संकूल येथील व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना आदेश देऊन महिलांना स्वतंत्रपणे विविध स्पर्धांचा सराव करण्यासाठी विशिष्ट असा वेळ निश्चित करावा.
महिला व विद्यार्थिनींच्या भविष्याचा विचार करून प्रोत्साहीत करावे. सोबतच शाळा-महाविद्यालयाच्या, कोचिंग सेंटर, कॉफी शॉप, बस स्टैंड, चांडक शाळा जवळील चौक परिसरातील पोलीस प्रशासना तर्फे दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. तसेच या ठिकाणी CC-TV कैमरे व महिला तक्रार पेटी (सुचना पेटी ) लावन्यात यावी. महिला व मुली यांच्या समस्या मांडण्या करीता महिला हेल्पलाइन क्रमांक बनवीण्यात यावा. महिला पोलिस यांचे दामीनी पथक सक्रिय करावे.चांडक शाळा जवळील बंद झालेली पोलिस चौकी परत सुरु करावी अशा विविध मागणी संदर्भात निवेदन प्रशासनाला उपविभागीय अधिकारी मलकापूर यांच्यामार्फत विश्व हिंदू परिषद मलकापूर तर्फे देण्यात आले. निवेदन देते वेळी विश्व हिंदू परिषद,बजरंग दल, मातृशक्ति, दुर्गा वाहिनी पदाधिकारी सदस्य तथा शहरातील विविध प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.