Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पगार सरकारी; वैद्यकीय सेवा खासगी : डाॅक्टर तुम्हीसुद्धा? बुलढाणा सामान्य रुग्णालयातील डाॅक्टरांचा प्रताप

 



बुलढाणा - सामान्य जनता ही डाॅक्टरांना देवदूताच्या रूपात बघत असते. अनेक डाॅक्टर खूपच चांगली कामगिरी करून रुग्णांना बरे करून त्यांना नवीन जीवन देत असतात. मात्र, काही डाॅक्टर याला अपवाद आहेत. ते डाॅक्टर आहेत बुलढाणा सामान्य रुग्णालयातील. हे डाॅक्टर पगार शासनाचा घेतात, मात्र मोठ्या प्रमाणात खासगी वैद्यकीय सेवा देऊन बक्कळ पैसाही कमावतात. या डाॅक्टरांचा हा गोरखधंदा कसा चालतो, यासंदर्भात आता दैनिक करुण भारत सविस्तर माहिती जनतेसमोर ठेवणार आहे.

सर्वसामान्य जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी, समाजाचे स्वास्थ्य चांगले रहावे, यासाठी शासनाच्या वतीने सामान्य रुग्णालये चालवली जातात. यामध्ये ग्रामीण रुग्णालयापासून ते सामान्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते शासकीय मेडिकल काॅलेज आणि हाॅस्पिटलपर्यंत स्थापित करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी डाॅक्टर, नर्सेस, तसेच विभिन्न प्रकारचा स्टाफ काम करीत असतो. सामान्य रुग्णालयात जे डाॅक्टर पगारी काम करतात, त्यांना पैसे घेऊन खासगी वैद्यकीय सेवा देण्याचा कोणताही अधिकार नाही. सरकारच्या वतीने डाॅक्टरांना बक्कळ पगार दिला जातो. मात्र जास्त पैशांच्या आमिषाने काही डाॅक्टर आपले प्राथमिक कर्तव्य विसरून पैशांच्या मागे धावतात. आज बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय असो की, महिला रुग्णालय असो या ठिकाणचे अनेक डाॅक्टरांनी आपले स्वतःचे मोठमोठे हाॅस्पिटल थाटलेले आहेत. हे डाॅक्टर एकीकडे शासनाचा पगार घेतात, दुसरीकडे आपल्या हाॅस्पिटलमध्येही रुग्णांवर इलाज करतात.

यासंदर्भात यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील काही डाॅक्टरावंर कारवाईदेखील झाली होती, मात्र परत स्थिति जैसे थे राहिली. विशेष म्हणजे या जिल्हा रुग्णालयातील काही डाॅक्टर तर थेट रुग्णच पळवण्याचे काम करतात. जिल्हा रुग्णालयात इलाज करण्यासाठी आलेल्या रुग्णाला गळ घातली जाते की, त्याने डाॅक्टरच्या खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार केला पाहिजे. कारण या सरकारी रुग्णालयात कोणत्याही सुविधा नाहीत, असे त्या रुग्णाला सांगितले जाते. 

हा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकार सुरू आहेत. रुग्ण कल्याण समिती असो की, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी सर्वांनाच याची माहिती आहे. कोणीही यापासून अनभिज्ञ नाही. मात्र कारवाईच होत नसल्याने सरकारी रुग्णालयातील काही डाॅक्टर आता एव्हढे निर्ढावले आहेत की, ते कुठलाही अभिनिवेश किंवा भीती न बाळगता खासगी प्रॅक्टीस जोरदार करीत आहेत. 

या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयात आलेल्या गरजू व गरीब रुग्णांना तेथील डाॅक्टरांच्या खासगी हाॅस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात. ड्यूटीच्या वेळी बरेच डाॅक्टर हे गायब असल्याच्या अनेक तक्रारी स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींकडे येत असतात. वर्षानुवर्षांपासून हा खेळ चालू आहे, परंतु कारवाईच्या नावाने मात्र शंख असतो. 

या सर्व प्रकाराच्या विरोधात दैनिक करुण भारत आता शांत बसणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत, यासाठी आम्ही येत्या काळात प्रयत्न करणार आहोत. शिवाय कोणत्या डाॅक्टरचे कोणते हाॅस्पिटल आहे, कोणते डाॅक्टर सरकारी रुग्णालयात आणि स्वतःच्या खासगी हाॅस्पिटलमध्ये केंव्हा असतात, याची संपूर्ण माहिती आगामी काळात प्रसिद्ध केली जाईल. तसेच कुचराई करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला बाध्य केले जाईल.


डॉ. प्रशांत पाटील यांच्याकडे स्त्री रुग्णालयात  क्लास टू ची पोस्ट असून त्यांचा खासगी रुग्णालय आहे हे नियमानुसार आहे का? नसल्यास वरिष्ठांकडून अद्याप पर्यंत कारवाई का नाही ?

डॉ. भागवत भुसारी हेही जिल्हा सामान्य रुग्णालयात अती जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहे ते ही स्वतःचा खासगी रुग्णालय चालवतात हे नियमात बसते का?