बुलढाणा येथे आंदोलनाचे वृत्त संकलन करण्याकरता गेलेल्या पत्रकारांना पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा प्रकाराचे निषेध तथा राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्या प्रकरणी कारवाई होऊन त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशा विविध मागणी करिता शहर पोलीस स्टेशन येथे मलकापूर पत्रकारांच्या वतीने ठिय्या आंदोलन करून निवेदन देत निषेध नोंदविण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल 11 फेब्रुवारी रोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचे वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या पत्रकारांना तेथील पोलीस प्रशासनातर्फे अटकाव करीत धक्काबुक्की करण्यात आली. हा प्रकार लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेला अटकाव घालण्याचा असून त्या संबंधि अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांनी प्रसिद्ध केलेली बातमी चा विरोध म्हणून त्यांच्यावर करण्यात आलेला अपघाती हल्ला हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही प्रकाराचा मलकापूर शहर व तालुका पत्रकारांच्या वतीने मलकापूर पोलीस स्टेशन येथे काळया फित लावून ठिया आंदोलन करीत निषेध नोंदविण्यात आला.
पत्रकारिता करीत असताना जनसामान्यांच्या विविध समस्या, भ्रष्टाचाराचा उलघडा, त्याचबरोबर विविध समाज उपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचे काम हे पत्रकार करीत असतात. आणि म्हणूनच त्याला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असे म्हणतात अशा या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर होत असलेल्या हल्ले तसेच प्रशासनाकडून करण्यात येणारा अटकाव पाहता पत्रकारांचे असल्याच्या निषेधार्थ आज मलकापूर तालुका व शहर पत्रकारांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार रमेश उमाळकर, वीरसिंह दादा राजपूत, हरिभाऊ गोसावी, हनुमान जगताप, राजेश इंगळे, मनोज पाटील, विनायक तळेकर,नारायण पानसरे, नितीन पवार, धीरज वैष्णव, गौरव खरे, समाधान सुरवाडे, कृष्णा मेसरे, विजय वर्मा, स्वप्निल आकोटकार, कैलास काळे, श्रीकृष्ण भगत, अजय टप, प्रवीण राजपूत, करण झणके, उमेश इटणारे, योगेश सोनवणे, दीपक इटणारे, सय्यद ताहेर, प्रदीप इंगळे, नागेश सुरंगे, किशोर सोनवणे शेख जमील, करन शिरसवाल, यांच्यासह मलकापूर शहर व तालुका चे पत्रकार आदी उपस्थित होते.