Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वारणानगर येथे केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगमंत्री नामदार नारायण राणे (साहेब) यांचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी स्वागत केले


श्री वारणा सहकारी दूध संघाच्या मुख्य दुग्धालयाच्या विस्तारीकरण व नूतनीकरण केलेल्या यंत्रसामुग्री प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगमंत्री नामदार नारायण राणे (साहेब) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या गायीच्या गोट्याला केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (साहेब) यांनी भेट दिली.

        यावेळी मुंबई दुग्ध व्यवसाय विभाग आयुक्त श्रीकांत शिपूरकर, मुंबई दुग्ध व्यवसाय विभाग उपायुक्त प्रशांत मोहोड,कोल्हापूर जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटे, पुणे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी संपत जांभळे, मिरज महाव्यवस्थापक शासकीय दूध योजना अधिकारी नामदेव दवडते,संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव,कार्यकारी संचालक मोहन येडूरकर,सर्व संचालक,अधिकारी,कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.