Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन

     



    भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं आज पु्ण्यात निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना पुण्यातील केईम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे प्रथम महापौर आणि माजी राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती होते. 

    तसेच ते विद्याभारती शिक्षण संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष होते. कॉंग्रेस पक्षाचे सक्रीय सदस्‍य असलेले डॉ. शेखावत हे १९८५ मध्‍ये अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून निवडून आले होते. ते १९९१ मध्‍ये अमरावतीचे प्रथम महापौर बनले. १९९५ च्‍या विधानसभेच्‍या निवडणुकीत मात्र त्‍यांना पराभव पत्‍करावा लागला होता. ७ जुलै १९६५ रोजी डॉ. देवीसिंह शेखावत आणि प्रतिभाताई पाटील हे विवाहबद्ध झाले होते. अनेक दशके ते अमरावतीच्‍या राजकीय आणि शैक्षणिक वर्तूळात कार्यरत होते. गेल्‍या काही वर्षांपासून ते पुण्‍यात वास्‍तव्‍याला होते.