मलकापूर शहरातील लक्ष्मी नगर येथील 27 वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची नोंद 25 फेब्रुवारी रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर शहरातील लक्ष्मी नगर येथील 27 वर्षीय आरती सचिन माळी कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.