दि. ६ जानेवारी २०२३, मलकापूर शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स, (सी.बी.एस.सी.) येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत कु. प्रथमेश शेलगेवार (इयत्ता ९ वी) आणि कु. धैर्य अग्रवाल (इयत्ता ६वी) या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या पहिल्या फेरीत घवघवीत यश संपादन केले असून शाळेची यशस्वीतेची परंपरा कायम राखली आहे तसेच या विद्यार्थ्यांचे परीक्षेच्या द्वितीय फेरीसाठी निवड झालेली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुदिप्ता सरकार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शाळेचे संचालक श्री. अमरकुमार संचेती यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.