मलकापूर शहरातील टिपू सुलतान चौक पारपेट येथे विद्युत बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. आरोपींवर विविध कलमान्वये मलकापुर शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रकाश एकनाथ पवार, वय 29 वर्ष, व्यवसाय नोकरी (वरीष्ठ तंत्रज्ञ) मलकापुर शहर भाग सालीपुरा, मलकापुर, जात- बौध्द, रा. बहापुरा, ता. मलकापुर, जि. बुलढाणा. व संतोष प्रकाश झनके वरीष्ठ तंत्रज्ञ मागील दोन वर्षापासुन वरीष्ठ तंत्रज्ञ म्हणुन भाग 1 सालीपुरा, मलकापुर येथे कार्यरत असून त्यांचे कडे वसुली व मेंटनन्सचे काम असते. आज सकाळी 10/00 वा. सालीपुरा कार्यालयाचे वरीष्ठ अमोल केशवराव काळबोंडे सहायक अभियंता यांनी थकबाकीदार ग्राहकांची विजबिल वसुली करणे करीता आपले सेक्शन ऑफीसमध्ये जावुन विजबिल वसुली करावी असे सांगीतले.
अशा आदेशावरुन प्रकाश एकनाथ पवार संतोष प्रकाश झनके वरीष्ठ तंत्रज्ञ विजबिल थकबाकीदार ग्राहकांची यादी सोबत घेवुन विजबिल वसुली करणे करीता मोटार सायकलने टीपू सुलतान चौक धनगरपुरा पारपेठ मलकापुर येथे राहणारे बिसमील्ला खान अमिर खान ग्राहक क्र. 293248081039 यांचे घरासमोर आज दि. 17/01/2023 रोजी सकाळी 11/30 वा चे सुमारास जावुन त्यांना आवाज दिला. त्यांचे घरातून एक पुरुष वय अंदाजे 40-45 वर्ष हे घराबाहेर आले. मी त्यांना सांगीतले की, तुमचे सप्टेंबर / 2022 पासुनचे विजबिल थकीत आहे. ते तुम्हाला भरायचे आहे. जर तुम्ही विज बिल भरले नाही तर तुमचे धरातील विदयुत पुरवठा आंम्हाला खंडीत करावा लागेल, असे आम्ही त्यांना सांगीतले. त्यावरुन नमुद इसमाने प्रकाश पवार यांना तु कैसे क्या मेरे घर की लाइन बंद करता है ये मैं देखता हु. तेरी XX में दम होगा तो तु लाइन बंद करके दिखा. असे बोलून शिवीगाळ केली. व अंगावर येवुन लोटपाट करून मला चापटा बुक्यांनी मारहाण केली.
त्यामध्ये त्यांच्या शर्टाचे बटन तुटुन शर्ट फाटले आहे. या मारहाणीचा व्हीडीओ त्यांचे सहकारी संतोष प्रकाश झनके वरीष्ठ तंत्रज्ञ यांनी काढला. त्या दरम्यान त्याच घरातील जावेद नावाचा एक पुरुष हा आला व त्याने सुध्दा मला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर या दोघांनी पवार यांना "तु अगली बार जब मेरे घर की लाइन कट करने आयेगा तो तेरा पूरा स्टाफ ओर पुलीस को भी साथ ले आना" अशी धमकी दिली. या झालेल्या वादाचे व्हीडीओ चित्रीकरण सहकारी संतोष प्रकाश झनके वरीष्ठ तंत्रज्ञ यांनी त्यांचे मोबाइलमध्ये केले आहे. त्या दोघांचे नांव शेख माजीद शेख मुसा व जावेद असे असल्याचे समजल्यावर पवार यांनी त्यांचे सोबत झालेल्या प्रकाराबाबत वरीष्ठ अमोल केशवराव काळबोंडे सहायक अभियंता यांना फोन करुन माहीती दिली.
मलकापूर शहर पोलीस स्टेशनला १) शेख माजीद शेख मुसा व २)शेख जावेद शेख उमर यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करुन मला अश्लिल शिवीगाळ करून मला चौपटा बुक्यांनी मारहाण. व मारण्याची धमकी तक्रार केली आहे दिल्याबद्दल तक्रार केली असून आरोपींवर भा. दं.वि. कलम ३५३,३३२,२९४,५०६ व ३४ गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मलकापूर शहर पोलीस ठाणे अंतर्गत सुरू आहे