मेहकर लोणार तालुक्यातील हिरडव च्या स्टेट बँक शाखेत व्यवस्थापक (मॅनेजर ) म्हणून कार्यरत असणाऱ्या ३२ वर्षीय उत्कर्ष पाटील नामक इसमाचा अज्ञातांनी गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याची घटना आज सायंकाळी ६.३० च्या नंतर उघडकीस आली. तर या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, मुंबई भागातील रहिवासी असलेले उत्कर्ष पाटील हे हिरडव शाखेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. अवघ्या ३ महिन्यांपूर्वी मुंबई येथून ग्रामीण भागात परिक्षाविधींन मॅनेजर म्हणून त्यांची हिरडव शाखेत मॅनेजर म्हणून काम पाहत होते. केवळ ३ च महिन्यपूर्वी या भागात नोकरीसाठी आलेल्या उत्कर्ष पाटील यांचा कुणी व कशासाठी खून केला असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामकाजात चोख आणि कायदेशीर असणारे उत्कर्ष पाटील हे कुठल्या तरी कारणामुळे विचलित होते व त्यांनी आपल्या नोकरीचा देखील राजीनामा सादर केलेला होता.
मात्र केवळ तीनच महिन्यात त्यांचे जीवन संपविण्यापर्यंत टोकाची अदावत जाईल अशा पद्धतीची उत्कर्ष पाटील यांची नसल्याने ह्या खुनाचा संबंध त्यांच्या भागातील जुन्या एखाद्या घडामोडीशी संबंधित असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. मारेकऱ्यांनी ज्या चाकूने त्यांच्या गळ्यावर वार केले तो चाकु देखील घटनास्थळी ठेवलेला होता हे विशेष
सदर खून हा रात्री थर्टी फर्स्ट च्या पार्टीतून घडला की आणखी यात काही रहस्य दडलेले आहे हे आता तपासाअंती स्पष्ट होईल. याप्रकरणी अजून गुन्हा दाखल होणे, घटनास्थळ निरीक्षण ह्या सगळ्याच तपासाच्या बाबी बाकी आहेत. मृतक उत्कर्ष पाटील यांची पत्नी व इतर नातेवाईक मेहकर च्या दिशेने निघाले असून पुढील बाबी कुटुंबीय पोहचल्यानंतर कळतील अशी माहिती मेहकर पोलिसांनी दिली आहे.
मुंबई ला करायची होती नोकरी
स्टेट बँकेत नोकरीला लागल्यानंतर काही काळ ग्रामीण भागात नोकरी करणे गरजेचे असते. २०१४ ला बँकेच्या सेवेत दाखल झालेल्या उत्कर्ष पाटील ने मुंबईत ८ वर्ष नोकरी केल्यानंतर त्यास बुलढाणा येथे कर्ज विभागात बदली करण्यात आली होती. अवघ्या ३ महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात दाखल झालेले उत्कर्ष पाटील हे ३ आठवड्या पूर्वी डेपूडेशन वर मेहकर भागात पाठविण्यात आले होते. राजीनामा सादर केलेला असल्याने त्यांना एकाच शाखेवर न ठेवता जिथे गरज असेल त्या शाखेवर पाठविल्या जायचे. त्यानुसार जानेफळ, हिवरा आश्रम आणि आता हिरडव येथे पाठविण्यात आले होते. परिवार मुंबई असल्याने मला मुंबई ला जायचे असल्याचे कारणाने त्यांनी राजीनामा सादर केला होता..