मलकापूर (प्रतिनिधी)- तुर खरेदीला मार्केटमध्ये दोन दिवसा अगोदर ७२०० ते ७६०० चा भाव होता आज अचानक मार्केटमध्ये तुरीची आवक वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडते, व्यापारी यांनी बेभाव ६००० पासून बोली लावणे सुरू केली. याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा करून देखील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कुठलेच उत्तर न दिल्याने स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज १३ जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करून निषेध नोंदविला. तुर खरेदीला मार्केटमध्ये दोन दिवसा अगोदर ७२०० ते ७६०० चा भाव होता. आज अचानक मार्केटमध्ये तुरीची आवक वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडते, व्यापारी यांनी बेभाव ६००० पासून बोली लावणे सुरू केली. खामगाव मार्केटला आजचा तुरीचा भाव ७५००रु. असून मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला बेभाव बोली लावत आहे. शेतकऱ्यांनी वारंवार विचारणा करून तेथील अधिकारी, कर्मचारी कोणीच बोलायला तयार नव्हते.
शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर स्वाभिमानीचे सचिन शिंगोटे मार्केटमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना विचारणा केली, कोणीच बोलायला तयार नव्हते. शेवटी शेतकऱ्यांना घेऊन राष्ट्रीय महामार्ग ६ वर रस्ता रोको करण्यात आला. त्यावेळी हजारो शेतकरी तेथे उपस्थित होते. नंतर शहर पो.स्टे. चे ठाणेदार अशोक रत्नपारखी यांनी शेतकरी व उत्पन्न बाजार समिती कमिटी सोबत चर्चा करून मार्ग काढू तोपर्यंत रस्ता मोकळा करा असे आवाहन शेतकऱ्यांना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला केले. त्यावेळी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अमोल राऊत, पक्षाचे तालुका अध्यक्ष नारखेडे, शिवाजी हिवाळे, अजय बावरकर हे हजर होते
.नंतर मार्केट कमिटी सोबत चर्चा करताना राष्ट्रवादीचे नेते संतोष रायपुरे, बालू पाटील, काँग्रेसचे नेते, बंडू चौधरी, राजू पाटील प्रवीण पाटील, शेतकरी नेते दामोदर शर्मा, रंजीत डोसे, मार्केट सचिव जाधव साहेब मार्केटचे व्यापारी व शेतकरी असंख्य शेतकरी हे हजर होते. या सर्वांच्या चर्चेनंतर पुन्हा खरेदीची सुरवात ७२०० पासून बोली सुरु झाली व शेतकन्यात आनंदाचे वातावरण तयार झाले. पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने वे भाव खरेदी केल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.