खामगाव शेगावसह जिल्ह्यात गांजा तस्करीचे मोठे रॅकेट सक्रीय असून शेगावात काल रात्री पोलिसांनी एका गुजरातमधील युवकास अटक करुन त्याच्याजवळून तब्बल १० किलो गांजा जप्त केला आहे.काल रात्री दरम्यान पेट्रोलिंग करीत असतांना पोलिसांना रेल्वेस्टेशन गेट समोर एक संशयीत युवक दिसून आला. यावेळी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने शहजाद खान फिरोज खान पठाण (२६) रा. अहमदाबाद गुजरात असे नाव सांगितले.
पोलिसांनी त्याच्याजवळील बॅगची झडती घेतली असता त्यात तब्बल १० किलो गांजा मिळून आला. यावेळी पोलिसांनी त्याला अटक करुन गांजा जप्त केला. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून शेगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात गांजा तस्करीचे मोठे रॅकेट सक्रीय अठ्ठय-2 टेलल्या जात आहे.