मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये पत्रकार दिनाचे औचित्य साधून ठाणेदार विजयसिंह राजपूत यांनी केला पत्रकारांचा पुष्प देऊन सत्कार.सविस्तर वृत्त असे की मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे काल दिनांक 9 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून मलकापूर शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मान केला यावेळी ठाणेदार विजयसिंह राजपूत यांनी सांगितले की मी दर वर्षी मी 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन सर्व पत्रकारांच्या समवेत साजरा करत असतो मात्र मी काही कामामुळे मलकापुरात हजर नसल्याने 9 जानेवारी रोजी हा कार्यक्रम घेत आहे असे मत व्यक्त केले व पत्रकार हे समजाला दिशा देण्याचे काम तुम्ही करीत असतात त्यामुळे पत्रकारांचा सन्मान होणे गरजेचे आहे
यावेळी रमेश उमालकर, हरिभाऊ गोसावी,हनुमान जगताप ,प्रवीण राजपूत,धनश्री काटिकर, गौरव खरे,स्वप्नील अकोटकर, समाधान सुरवाडे,करण शिरस्वाल,नारायण पानसरे,अजय टप,सतीश दांडगे,मनोज पाटील,विजय वर्मा,उल्हास शेकोकार, नथ्थू हिवरले,दीपक इटणारे,धर्मेश ठाकूर,जमील शेख,निसार शेख,सैय्यद ताहेर,अशोक रवनकार,यांच्या सत्काराला उपस्थित उपनिरीक्षक सुरेश रोकडे,उपनिरीक्षक रातनसिग बोराडे,उपनिरीक्षक स्मिता म्हसाये,उपनिरीक्षक बालाजी सानप,पोलीस कॉन्स्टेबल आनंद माने,ईश्वर वाघ,भगवान मुंडे,आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते