डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची परिवर्तनशील विचारसरणी प्रतिकूल परिस्थितीत जनमानसात खऱ्या अर्थाने रुजविनारे,भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष मराठवाड़ा विद्यापीठ नामविस्ताराचे अग्रणी शिलेदार
समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या 1 4 व्या स्मृतीदिनानिमित्त 11 जानेवारी 2023 रोजी एपीएमसी हाॅल, मलकापूर येथे अभिवादन सभा व पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता
याप्रसंगी समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात येवून अभिवादन करण्यात आले
पत्रकारांचा करण्यात आला सन्मान |
तसेच या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांचे हस्ते मलकापूर येथील पत्रकार बांधवांचा सन्मान करून भेटवस्तू देण्यात आल्या सभेचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रमेशभाऊ उमाळकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून वीरसिंह राजपूत, धनश्रीताई काटीकर, सुशील मोरे, भाऊराव उमाळे ,नारायणराव जाधव, नथुजी हिवराळे, राजू शेगोकार यांची उपस्थिती होती
यावेळी समाजरत्न दयाभाई खराटे यांच्या जीवन कार्यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमास अजय टप, उल्हासभाऊ शेगोकार,करणसिंह सिरसवाल, गौरव खरे, स्वप्निल आकोटकर ,राजेश इंगळे समाधान सुरवाडे, प्रवीण राजपूत, अनिल गोठी ,श्रीकृष्ण भगत, विनायक तळेकर, नारायण पानसरे , सतीश दांडगे, योगेश सोनवणे , विजय वर्मा, गजानन ठोसर, अनिल गोठी, श्रीकृष्ण तायडे,प्रा.प्रकाश थाटे, सय्यद ताहेर, शेख जमील, शेख निसार, दीपक इटनारे,अनिल झनके ,प्रदीप इंगळे आदी पत्रकारांसह ,जि.एन. इंगळे, विलास तायडे, विलास गुरव उपस्थित होते