जिल्ह्यात मोटार सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असतांना जिल्हा पोलीस अधिक्षक श्री सारंग आवाड यांनी सर्व पोलीस अधिकारी यांना सदर गुन्हेगाराबाबत माहीती काढून घडलेले गुन्हे उघडकीस आणुन गुन्हे प्रतिबंध करणेबाबत सुचना दिल्या असतांना दिनांक 05/12/2022 रोजी शकील शहा रफिक शहा, रा. भुसावळ, ता. भुसावळ, जि. जळगांव यांनी मलकापुर शहर स्टेशनला येवून तक्रार दिली की, मलकापुर बस स्थानका मागील मंदीराजवळुन कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी त्यांची हिरो होंडा कंपणीची एम.एच.19, डब्ल्यू. 6610 ही गाडी चोरून नेल्याने गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा उघडकिस आनण्यासाठी पो. नि. राजपुत यांनी डी.बी. पथकाचे स.पो.नि. भोरकडे आणि त्यांच्या टिमला मार्गदर्शन करुन सुचना दिल्यावर सदर टिमने गुन्ह्यातील गेल्या मो.सा. व अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याकामी बुलडाणा रोडावरील वानखेडे पेट्रोल पम्पासमोर गती रोधकावर नाकाबंदी लावुन वाहने चेक करण्याची मोहीम सुरु असतांना गुन्ह्यात चोरीस गेलेली मो.सा आरोपीसह मिळुन आल्याने त्यांना त्याचे नाव, गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) तेजस संजय पोकळे, रा. रोहीणखेड, ता. मोताळा, जि. बुलडाणा व क्र. 2) रविंद्र पांडुरंग बोरसे, रा. नेर, ता. जि. धुळे या दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून पो.स्टे. ला आणुन त्यांची मजबुत सखोल चौकशी केल्यावर त्यांना गुन्ह्यात अटक करुन त्यांचा दोन वेळा पी.सी. आर. घेवुन त्यांनी चोरी केलेल्या एकुण 1लाख 90 हजार रुपये कि.च्या 07 मोटार सायकल आजपावेतो जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यांचे वर्णन खालील प्रमाणे.
1) हिरो होन्डा कंपणीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मो.सा. क्र.एम. 19. डब्ल्यु 6610 चेसीस नं. 02G20C30504 व इंजिन नं. 02G18M31397
2) हिरो होंडा कंपणीची काळ्या रंगाची निळे पट्टे असलेली विना नंबरची चेचिस नं. MBLHA10EE9HC 13269
3) हिरो होंडा कंपणीची काळ्या रंगाची अँचिवर मो. सा. क्र. ए. एस. 01. ए.डी. 7812 चेचिस क्र. 06FBBC00140 व इंजिन क्र. 06FBAM00480
4) हिरो होन्डा कंपणीची काळ्या रंगाची निळा पांढरा पट्टा असलेली बिना नंबरची स्प्लेंडर प्लस मो.सा. चेचिस नं. 06M16C0O368 व इंजिन नं. 06M15M00221
5) हिरो होंडा कंपणीची लाल रंग असलेली स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम. एच. 19. ए.एफ.9865 चेचिस नं. OSC16CC12532 व इंजिन क्र. OSCISM12614
6) सुझुकी कंपणीची निळा रंग पांढरा पट्टा असलेली विना नंबरची मो.सा. इंजिन नंबर व चेचीस नंबर नसलेली
7) बजाज कंपणीची लाल टाकी असलेली विना नंबरची मो.सा.चेचिस नंबर DFFBFL34274
या अणुषंगाने कौतुक करण्यासारखी बाब अशी की, पो. नि. राजुपत व डी. बी. पथकाचे स.पो.नि. भोरकडे आणि त्यांच्या टिमला वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनाप्रमामे सव्वा वर्षात मलकापुर शहर पो. स्टेला दाखल असलेल्या गुरजि. नं. 116/2021 232/21, 427/2021, 429/2021, 324/2022, 370/2022, 456/2022, 518 /2022, अशा एकुण 8 गुन्ह्यात अद्याप पावेतो 50 मोटार सायकल हस्तगत करुन जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील 15 पेक्षा जास्त गुन्हे उघडकिस आणून मो.सा. चोरी करणा-या 25 चोरट्यांच्या मुसक्या आवळुन त्यांना बेड्या ठोकण्यात मलकापुर शहर पोलीसांना यश आल्याने जन मानसातुन पोलीसांचे कौतुक होत आहे.
सदरची कार्यवाही मा.सारंग आवाड पोलीस अधिक्षक बुलढाणा, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधिक्षक खामगांव, मा. अभिनव त्यागी उपविभागिय पोलीस अधिकारी मलकापुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पो.स्टे. प्रभारी अधिकारी विजयसिंह राजपुत व सपोनि सुखदेव भोरकडे पो. का. असिफ शेख, पोका प्रमोद राठोड, पोका ईश्वर वाघ, पोका गोपाल तारुळकर, पोका, पोका सलीम बरडे यांनी केली आहे.
या निमीत्ताने पो. नि. राजपुत यांनी जनतेला आवाहन केले आहे की, आपण वापरत असलेल्या गाड्यांचे स्विच चांगले कंडिशन मध्ये ठेवून मो.सा.ची. खरेदी विक्री करतांना कागदपत्रा शिवाय व्यवहार करु नये व काही संशयास्पद आढळुन आल्यास पोलीसांना माहीती देवून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.