धामणगाव बढे
राजे छत्रपती कला महाविद्यालय धामणगाव बढे येथे २६ नोव्हेंबर २०२२ संविधान दिन ते ०६ डिसेंबर महापरीनिर्वाण दिना दरम्यान समता पर्वाचे आयोजन ग्रंथालय विभागाच्या वतीने करण्यात आले होते. सदर समता पर्वाचा अंतिम टप्पा म्हणून महाविद्यालया मध्ये ०६ डिसेंबर २०२२ रोज मंगळवारला महापारीनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. नितीन जाधव, प्रा. डॉ. गोविंद गायकी आणि प्रा.डॉ. विजय मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथपाल प्रा. डॉ. स्वप्नील दांदडे यांनी प्रस्तावनेतू महापरीर्वाण दिना पर्यंतच्या बाबासाहेबांच्या कार्याची उजळणी थोडक्यात वर्णन करून पाहुण्याचा परिचय करून दिला. प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. अविनाश मेश्राम यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण समाजाचे उर्जास्त्रोत असून भारतातच नव्हे तर विदेशात देखील पुजल्या गेलेले विद्वान असल्याचे मत व्यक्त केले. पुढे बोलताना डॉ. मेश्राम म्हणाले कि माणूस उपासमारीने कुपोषित होऊन बलहीन होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध होऊन दुस-याचा गुलाम होतो आणि म्हणून ज्ञानाचे प्रतिक डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून आपण शिक्षित नव्हे तर साक्षर होऊन समाजात आपले स्थान निर्माण करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. माणसाच्या सामाजीक, राजकीय, आर्थिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षण हा बाबासाहेबांनी दिलेल्या एकमेव पर्यायावर विशेष मार्गदर्शन डॉ. मेश्राम यांनी केले.
डॉ. गोविंद गायकी यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्राथमिक शिक्षण, सहशिक्षण, व उच्चशिक्षण संबधी विचारावर प्रकाश टाकून शिक्षकांच्या आणि विध्यार्थ्यांच्या भूमिकेवर देखील विचार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेबांच्या विद्यापिठीय तर्कविसंगत परीक्षा पद्धतीवरील विचारांना उजाळा देताना डॉ. नितीन जधव यांनी आपल्या मार्गदर्शनातून उदासीन वृत्तीचा त्याग करून इतरांना देखील शैक्षणिक प्रगती करून समाजात एक आगळे वेगळे स्थान मिळविण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
सदर कार्यशाळेला डॉ. शाहेदा नसरीन, डॉ. भगवान गरुडे, डॉ. महादेव रिठे, प्रा. दीपक लहासे, प्रा. शशिकांत सिरसाट, ग्रंथालय परिचर संदीप तोटे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशश्वी आयोजनाकरिता वैष्णवी मोदे, पल्लवी उबाळे, पूनम शेजोल, हर्षाली हिवरे, वैष्णवी काकर, नाझ्मीन पटेल, उमेश जाधव, राज कुर्हाडे, सुरज भोरे, मंगेश खवडे, रोषण अहिरे, राहुल जाधव यांनी परिश्रम घेतले.