Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ट्रक व दुचाकीच्या अपघातात वाघुड येथील एक ठार एक गंभीर जखमी


वडनेर भोलजी प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर वडनेर पुलानजीक दुचाकी व ट्रकमध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज २ डिसेंबर रोजी घडली. घटनेची माहिती अशी की, वाघुड येथील गोपाल संजय सातव (वय २८) व सुनील मधुकर सातव (वय ३५) रा. वाघुड हे मोटार सायकल क्र. एमएच २८ बिई २५८५ ने नांदुरा वरून मलकापूरकडे येत होते. त्यांच्या गाडीचा ट्रक क्रमांक एमएच ०४ या अपघातात गोपाल सातव याचा मृत्यू झाला असून सुनिल सातव हा गंभीर जखमी एचएस १४५९ सोबत अपघात झाला असून त्याच्यावर मलकापूर येथे उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळतात ओम साई फाऊंडेशनचे स्वयंसेवक विलास निंबोळकर, पियूष मिहानि, श्रीकृष्णा नालट, सचिन पुंडे, आनंद वावगे व वडनेर पोलिस चौकीचे एपीआय मानकर, पोलीस कर्मचारी संजय निंबोलकार व वडनेर पिएचसी येथील संदीप सातव हे १०२ रुग्णवाहिकासह घटनास्थळी हजर झाले होते. त्यांनी अपघातग्रस्ताला मलकापूर येथे पुढील उपचाराकरीता रवाना केले. नांदुरा पो.स्टे. पो.नि.अनिल बेहरानी सांगीनी स्थळी भेट दिली.