मलकापूर:-पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना तुटतुंजा पिक विमा देत असून एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा या कंपनीने चालवली आहे,विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम तात्काळ द्यावी विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्यांची लाईट दिवसा लोडशेडिंग करीत असून थंडीच्या दिवसात शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी रात्री जावे लागत असल्याने हे लोड शेडिंग ही तात्काळ बंद करावे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने किमान आठ तास दिवसा वीजपुरवठा व्हावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
निवेदनावर शिवसेना विधानसभा संघटक राजेश सिंह राजपूत, शहर प्रमुख गजानन ठोसर,उपशहरप्रमुख प्रा.कृष्णा मेहसरे,शकील जमादार,समद कुरेशी, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, कामगार सेना शहर प्रमुख सै.वसीम,कामगार सेना तालुकाप्रमुख रामभाऊ थोरबोले, शहरप्रमुख हरीदास गणबास, युवासेना शहरप्रमुख पवन गरुड, उपशहरप्रमुख सै.यासीन, रामराव तळेकर,विजय झांबरे,ईमामशाह, आकाश बोरले, संतोष बोरले,चाॅद चव्हाण,मो.ईसाक तेली सह शिवसैनिकांची उपस्थिती होती.