Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पत्नीचा खून करून स्वतः ही घेतला गळफास माऊली भोटा येथील घटना

  


प्रतिनिधी

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येत असलेल्या माऊली भोटा येथील साठ वर्षीय मानसिक रुग्ण असलेल्या वृद्धाने झोपेत असलेल्या पत्नीचा मानेवर कु-हाडीचा घाव घालत खून करून स्वतःही घराच्या छताच्या लोखंडी अँगल ला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

सविस्तर असे की जळगाव जामोद तालुक्यातील माऊली भोटा येथील रहिवासी असलेले बुधाजी वानखडे हे मानसिक रोगी असल्यामुळे गावाजवळ असलेल्या शेतामध्ये वृद्ध व त्याची पत्नी असे दोघेजण झोपडी मध्ये राहत होते. चार दिवसापासून बुधाजी वानखडे हे स्वतःच बडबड करत होते. तसेच विनाकारण पत्नी शोभाबाई यांच्यासोबत भांडण करत होते. दिनांक २७ डिसेंबरच्या रात्री शोभाबाई वानखडे यांचा वृद्धपती बुधाजी वानखडे यांनी रात्रीच्या सुमारास गाढ झोपेत असलेल्या शोभाबाई चा कुराडीने मानेवर घाव घालून खून केला. तसेच स्वतः ही झोपडीत असलेल्या कापसाच्या गंजीवर चढून झोपडीच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी अँगल ला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

     सकाळी बुधाजी वानखडे यांचा मुलगा सदानंद वानखडे हा गव्हाला पाणी देण्याकरिता आला असता त्यांनी आई व बाबाला जोर जोरात हाक मारण्यास सुरुवात केली असता झोपडीतुन काही आवाजाला नाही जोरात त्याने दरवाजा उघडला असता त्यांना शोभाबाई या रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडलेल्या दिसल्या व समोरच वडीलही गळफास घेऊन लटकलेले दिसले असता त्याने आरडाओरडा केली आवाजाने गावातील लोक धावून आले. 

    मुलगा सदानंद वानखडे यांनी घटनेची फिर्याद जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली असता घटनास्थळी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व दोघांचेही मृतदेह जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये शवविच्छेदनासाठी पाठविले. या गुन्हयामध्ये जळगाव जामोद पोलीस स्टेशनला कलम ३०२ चा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास ठाणेदार सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शना खाली एपीआय सागर भास्कर करीत आहेत