Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना उपजिल्हाधिकारी घुगे एसीबीच्या जाळ्यात : क्लर्क आणि वकीलही सहभागी

 

ऍन्टी करप्शन ब्यूरोची धडाकेबाज कारवाई


बुलडाणा (प्रतिनिधी)

  पद आणि लाचेची रक्कम बघता ही यावर्षातील सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल. सुमारे एक लाख स्वीकारतांना भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. या लाच प्रकरणात लिपीक नागोराव खरात यालाही ताब्यात घेण्यात आले असून धक्कादायक बाब म्हणजे मोताळा येथील वकील अनंत देशमुख यांच्यामार्फत ही लाच स्वीकारण्यात आली. सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात हा सापळा यशस्वी झाला. प्रकरण भूसंपादनाला घेऊन आहे. जिगाँव प्रकल्पामध्ये हिंगणे इच्छापूर  येथील एका शेतकरी तक्रारदाराच्या वडीलांची जमीन भूसंपादीत करण्यात आलेली आहे. दीड एकरच्या या जमीनीचा मोबदला सरकारकडून जमा झाला. दरम्यान तक्रारदाराचे वडील मयत पावले आणि मोबदल्याची रकम तक्रारदाराच्या चुलत्याच्या खात्यावर जमा झाली. अर्थात ही चूक भूसंपादन विभागाची होती. तक्रारकर्त्याच्या वडीलांचे नांव रविंद्रफ होते आणि चुलत्याचे राजेंद्र.. रविंद्रच्या ऐवजी राजेंद्र झाल्यामुळे रक्कम तक्रारकर्त्याला मिळत नव्हती. जी चूक भूसंपादन विभागाने केली,

   त्याच्याच दुरुस्तीचे तक्रारदार शेतकऱ्याकडून एक लाख रुपयेलाचेच्या स्वरुपात उपजिल्हाधिकारी घुगे यांनी मागितले. लिपीकामार्फत ही रकम वकील अनंत देशमुख यांना देण्याचे ठरले. तक्रारदाराने इकडे भ्रष्टाचार विरोधी प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास एक लाख रुपये घेवून तक्रारदार शेतकरी भूसंपादन विभागात पोहोचला.

  जिल्हाधिकारी कार्यालयातील वकील अनंत देशमुख आणि लिपीक नागोराव खरात यांनी रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने उपजिल्हाधिकारी घुगे, लिपीक खरात आणि वकील  देशमुख  या तिघांनाही पकडले. तिन्ही विभागाचे आरोपीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही धडाकेबाज डीवायएसपी या कामगिरीबद्दल एसीबीचे सर्वत्र श्री कदम, पीआय भोसले, बुलडाणा पीआय सचिन इंगळे, एएसआय भांगे, हेक साखरे, पोलीस नाईक लोखंडे, पवार, बैरागी  आदिंनी यशस्वीरित्या पूर्ण केली. कारवाई वाशिम येथील  कौतुक होत आहे.