मलकापुर. त्रिशरण सामाजिक बहुउद्देशीय मंच च्या वतीने आयोजित बौद्ध धम्मय उपवर वधू मिळावा 25 डिसेंबर 2022 रोजी पंचायत समिती मलकापूर सभागृहात संपन्न झाला या मेळाव्यात उपवर वधू युवक युवती व कित्येक पालकांनी आपला परिचय देऊन आपल्या जोडीदार प्रती. अपेक्षा व्यक्त केल्या तर याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह असलेले आर्यन आर आर एन वानखेडे गुरुजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आम्ही निस्वार्थपणे सामाजिक बांधिलकीची जोपासना करतो आमच्या या मेळाव्याच्या कल्पनेतून समाजातील कित्येक युवक युवती चे लग्न झालेली आहे तर वधू वर पुस्तकातून लग्न जुळलेली आहे
समाज बांधवांनी अशीच साथ दिली तर आम्ही सामूहिक विवाह सुद्धा आयोजित करू उपवर वधूच्या पालकांना आर्थिक मानसिक व शारीरिक श्रमापासून वंचित करू मात्र त्यासाठी आम्हाला समाज बांधवांचा प्रतिसाद मिळाला तर हे शक्य आहे असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला भदंत महानाम व भदंत मोग्गलायन यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन दिप प्रज्वलन आणि त्रिशरण व पंचशील तत्वाचे वाचन करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रामचंद्र वानखेडे गुरुजी तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंद भाऊ शिरसाट समतेचे निळे वादळ चे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार माजी नगरसेवक प्रमोद दादा अवसरमोल बसपा जिल्हा प्रभारी धर्मपाल इंगळे पत्रकार नथ्थुजी हिवराळे प्रभाकर इंगळे गुरुजी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रस्ताविकता मुख्य आयोजन भिवाभाऊ चोपडे म्हणाले की आमच्या संस्थेचा उद्देश सामाजिक सेवेचा आहे
त्यामुळे त्यांनी हेवेदावे सोडून आमच्या कार्यात संयोग केला तरच आमचे कार्य सिद्धीस जाऊ शकते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला आहे परंतु शिक्षण घेतल्यानंतर संघटित होत. नाहीच नोकरी लागल्यानंतर स्वतःला सुशिक्षित व उच्च समजतो आणि आपल्या समाज बांधवांना विसर तो असे प्रतिपादन केले मिळाव्यात आनंद शिरसाट राजेंद्र पवार धर्मपाल जी इंगळे यांनी समाजाच्या कल्याणासाठी समाज बांधवांनी अशा संघटनेच्या कार्यात तन-मन-धनाने सहकार्य करावे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या यशस्वी साठी एके मोरे कैलास इंगळे एमडी जाधव राजू वाकोडे ग्रामपंचायत सदस्य रमेश झनके महादेव तायडे भाऊसाहेब साठे दिवाकर वानखेडे यांनी प्रयत्न केले