नांदुरा/प्रतिनिधी
वाईट उद्देशाने एका 38 वर्षीय महिलेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी शासकीय कंत्राटदार असलेला विनायक पांडुरंग मुकुंद यांच्यासह कृष्णा विनायक मुकुंद, छोटू बोबडे राहणार सर्व नांदुरा यांच्यावर नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 38 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता दरम्यान फिर्यादी घरामध्ये काम करीत असताना फिर्यादीच्या घरासमोर आरोपी विनायक पांडुरंग मुकुंद, कृष्णा विनायक मुकुंद, छोटू बोबडे हे चार चाकी गाडी घेऊन फिर्यादीच्या घरासमोर आले व त्यांनी काही कारण नसताना घरासमोर येऊन आरोपी तिघांनी फिर्यादीच्या भाऊ व आई यांना अश्लील शिवीगाळ करू लागले असता फिर्यादी ही आरोपी त्यांना म्हणाली की आम्हाला शिवीगाळ का करीत आहे तर आरोपी त्यांनी फिर्यादीच्या पोटात लाथा मारल्या व माझा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला.
तसेच पिढीतेच्या कपड्याची ओढाताण करून लोटपात केली व हात ओढला तसेच पिढीतेचा भाऊ यांच्या डाव्या हाताला कशानेतरी मारहाण केली. यामुळे सूज आली तसेच फिर्यादीची आई भांडण आवरण्यास आली असता फिर्यादीच्या आईचा उजव्या हात पिरघळून लोटून दिले. त्यामुळे फिर्यादीच्या आईने ओरडा ओरडा केली असता तिन्ही आरोपी हे गाडीत बसून निघून गेले तसेच तीनही आरोपीतांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपीतांकडून फिर्यादीच्या भावाला धोका आहे असे नमूद केले आहे. अशा पिडीतेच्या तोंडी तक्रारीवरून आरोपी विनायक पांडुरंग मुकुंद, कृष्णा विनायक मुकुंद व छोटू बोबडे राहणार सर्व नांदुरा यांच्यावर अप. नंबर 718/ 2022 कलम 354, 294, 323, 504, 506, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल बेहराणी यांच्या आदेशाने पोना राजेंद्र पारधी हे करीत आहे.