Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जिल्हास्तर शालेय क्रीकेट स्पर्धा मुळे विद्यार्थी तसेच क्रीडा शिक्षक- प्रशिक्षकां मध्ये आनंदाच्या लहरी उसळल्या

 


बुलडाणा ,प्रतिनिधी 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे; जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा  जिल्हा क्रिकेट संघटना, मलकापूर यांचे संयुक्त विद्यमाने जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे 17 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील मुले तसेच  सहकार विद्यामंदिर, बुलढाणा येथे 14 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील मुलींचे शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट सामने दि.28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर ह्या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनात , चंद्रकांत साळुंके सचिव बुलढाणा जिल्हा क्रिकेट संघटना आणि  अनिल इंगळे  राज्य क्रीडा मार्गदर्शक , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या कुशल संयोजनात आयोजित करण्यात आले.

जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे 17 वर्षाखालील व 19 वर्षाखालील मुलांसाठी स्पर्धेला उद्घाटक म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव  तर सहकार विद्यामंदिर, बुलढाणा येथे 14 वर्षाखालील मुले तसेच 17 व 19 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून सहकार विद्यामंदिर, बुलढाणा चे प्राचार्य अलगर सामी लाभले होते. 

जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलढाणा येथे पार पडलेल्या स्पर्धेसाठी अनिल इंगळे  राज्य क्रीडा मार्गदर्शक व स्पर्धा संयोजक; चंद्रकांत साळुंके  सचिव, जिल्हा क्रिकेट संघटना,मलकापूर; भारत विद्यालयाचे क्रिकेट प्रशिक्षक संजय देवल  बुलढाणा जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी  श्रीकृष्ण शेटे  , जि. प. हायस्कूल,मंगरूळ नवघरे येथील क्रीडा शिक्षक श्री.अविनाश घुगे, जि. प. हायस्कूल,साखळी बु. चे क्रीडा शिक्षक दत्तात्रय कुळकर्णी व गणेश डोंगरदिवे यांनी विशेष परिश्रम घेतले; तर सहकार विद्यामंदिर, बुलढाणा येथे पार पडलेल्या स्पर्धेसाठी अनिल इंगळे , राज्य क्रीडा मार्गदर्शक व स्पर्धा संयोजक; चंद्रकांत साळुंके सचिव, जिल्हा क्रिकेट संघटना,मलकापूर; सहकार विद्यामंदिर, बुलढाणा चे क्रिकेट प्रशिक्षक  राजू ढाले  व चेतन सोनुने; हॉकी प्रशिक्षक सैयद आबिद , मंजेश मुंडे, ओम राऊत,सुहास राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. 

सामन्यांमध्ये पंच म्हणून समीर शेख, ओम गायकवाड, नईम खान, राम दाभाडकर, विवेक भुयारकर ,मलकापूरआणि आशीष खत्री,खामगाव यांनी काम पाहिले. 

14 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत सहकार विद्यामंदिर बुलढाणा संघ विजयी झाला तर एम. एस. एम. मलकापूर उपविजेते ठरले. 

17 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत भारत विद्यालय, बुलढाणा विजयी तर स्कूल ऑफ स्कॉलर्स उपविजयी राहिले. 

17 वर्षाखालील मुलींमध्ये राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा, चांधई विजयी तर राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल, देऊळगाव राजा उपविजयी ठरले. 

19 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा, चांधई विजयी तर संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल ,शेगाव उपविजयी ठरले. 

19 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत गो. से. महाविद्यालय, खामगाव संघ विजेते तर भारत कनिष्ठ महाविद्यालय संघ उपविजयी ठरला.स्पर्धेतील विजयी संघ विभागीय क्रीकेट स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.