खामगाव : तालुक्यातील बोरी, अडगाव, मोहदरी शिवारातील धरणाच्या काठावर पोलिसांनी गावठी दारुअड्ड्यावर धाड टाकली. यावेळी १ लाख १७ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पाच जणांना अटक करण्यात आली. ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने पोलिसांच्यावतीने दारू विक्रेत्यां विरोधात मोहीम कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी बोरी, अडगाव, मोहदरी शिवारात धाड टाकून ४१३६ लिटर मोहा सडवा, ७८
लिटर गावठी दारूसह १ लाख १७ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच गजानन मोतीराम बघेवार, प्रकाश प्रल्हाद कीर्तने, सुरेश गुलाब पठाण, आनंदा सखाराम सुरवाडे, वैभव आनंदा आसटकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, दिलीप त्र्यंबक बघेवार फरार झाला. ही कारवाई अवैध प्रभारी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आ. के. फुसे, दुय्यम निरीक्षक एन. के. मावळे, प्रदीप देशमुख, गणेश मोरे, अमोल सुसरे, मोहन जाधव यांच्या पथकाने केली.