चोरीच्या गाड्यांची बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
जिल्ह्याभरात केले जात आहे डी.बी.पथकाचे कौतुक
बुलडाणा शहर व इतर ठिकाणावरून मोटार सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असतांना नव्यानेच झालेले पोलीस अधिक्षक श्री सारंग आवाड यांनी सर्व पोलीस अधिकारी यांना सदर गुन्हेगाराबद्दल माहीती काढून घडलेले गुन्हे उघडकीस आणून गुन्हे प्रतिबंध करणेबाबत सूचना दिल्या असतांना मलकापुर शहर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पो नि विजयसिंह राजपूत यांना गोपणीय माहीती मिळाली की, बुलढाणा परिसरातून चोरी होणा-या गाड्या मलकापुर येथे आणण्यात येत आहेत. या माहिती वरुन त्यांनी मलकापुर शहर पोलीस स्टेशनच डी बी पथकाचे इंचार्ज स. पो. नि. सुखदेव भोरकडे यांना माहीती देवून सदर गाड्या बाबत व गुन्हेगाराबाबत गोपणिय माहीती काढण्याबाबत सुचित केले. त्याप्रमाणे पडताळणी करीत असतांना सोहेल परवेज़ काजी अनिसाहीन, साहनपुरा मलकापुर यांचेकडे असलेल्या गाडीचे कागदपत्र व गाडीवरील चेचिस नंबरची खात्री केली असता ते बनावट असल्याचे समजले त्यावरुन त्यांनी मोटार सायकल पोलीस स्टेशनला आणून फिर्याद दिल्यावरुन अ न456/2022 कलम 420,465,468,471,120 ब भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात मोटर सायकल विक्रेत्यांची मदत करणारा मो जावेद शेख अय्युब व त्याचा मित्र शोएब खान विस्मील्ला खान दोन्ही रा. अहमदशाहपुरा पारपेट मलकापुर हे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन माहीती घेतली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या गाड्या बुलडाणा शहर व इतर ठिकाणावरुन चोरुन बनावट कागदपत्र तयार करून विक्री करीत असल्याचे सांगितले
1) से समीर से युसुफ, 2) से शकील से युसुफ (डॉन) व खडकी ता मोताळा येथील 3) आकाश हरी राठोड हे निष्पन्न झाल्याने त्यांना त्यांना अटक करण्यासाठी बुलडाणा शहर पोलीसांची मदत घेवुन से. शकील उर्फ डॉन आणि आकाश राठोड यांना रात्रीच ताब्यात घेण्यात आले आहे. असे चार आरोपी अटक करण्यात आले असून त्यांचा पी.सी.आर. घेवून आरोपीतांकडुन आजपावेतो बनावट कागदपत्र तयार करुन विक्री केलेल्या 3,75,000/-रु.किमतीच्या गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.
1 एक पाढ-या रंगाची एक्सेस स्कुटी जिचा क्र एमएच 28 बीआर 4034
2 एक काळया रंगाची ज्यावर सिल्वहर पटटे असलेली स्पेन्डर प्सस हीरो कंपनीची जीचा क्र
3 एक पाढ-या रंगाची एक्सेस स्कुटी जीचा क्र एमएच 03बीएम 4274
4 एक लाल काळया रंगाची प्लसर जीचा क्र एमएच 28 एके 8863
5 एक पाढं- या रंगाची एक्सेस स्कुटी जीचा क्र एमएच 28बी एल 7162
6 एक काळया रंगाची प्लसर जीचा क्र एमएच 28 ए डब्लु 5118
नमुद 'आरोपीतांनी कबुली मध्ये बनावट दस्तऐवज आर. सी. बुक, आधारकार्ड, स्टॅम्प पेपर इत्यादी तयार करणारा मास्टर माइंड सै. समीर सै.युसुफ व त्याचा भाऊ सै.शकील सै.युसुफ (डॉन) हे असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोघे व आकाश राठोड हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द मोटार सायकल चोरी, घरफोडी व इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मोठे रॅकेट असुन मुख्य आरोपी सै. समीर सै. युसुफ यास लवकरच ताब्यात घेवुन गुन्ह्याची अधिक उकल करण्यात येणार असल्याची माहिती मलकापूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजयसिह राजपूत यांनी दिली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक बुलढाणा सारंग आवाड , श्रवण दत्त अपर पोलीस अधिक्षक खामगांव, अभिनव त्यागी उपविभागिय पोलीस अधिकारी मलकापुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पो स्टे प्रभारी अधिकारी विजयसिंह राजपुत व सपोनि सुखदेव भोरकडे तसेच पो.हे.कॉ. भगवान मुंढे, पोका गोपाल तारुळकर, पोका ईश्वर वाघ पोका असिफ शेख, पोका सलीम बरडे, पोका प्रमोद राठोड, पो. का. गोपाल इंगळे यांनी केली आहे. मलकापुर शहर पोलीस स्टेशन कडुन यापुर्वी वर्षभराचे कालावधीत एकुण 36 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असुन त्यावरुन मलकापुर शहर, बुलढाणा, जळगांव, अकोला व औरंगाबाद जिल्ह्यातील 15 पेक्षा जास्त मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणले आहे. व त्याप्रमाणे सतत कार्यवाही सुरु असुन गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. सुखदेव भोरकडे करीत आहेत.
या निमीत्ताने पो.नि. राजपुत यांनी जनतेला आवाहन केले आहे की, आपण खरेदी केलेल्या गाड्याचे कागदपत्राची खात्री करावी, वाहनाचे कागदपत्र व गाडीवरील चेचिस नंबर पडताळून पहावा चुकीचा आढळल्यास पोलीस स्टेशनला तक्रार करावी असे आवाहन केले आहे.
मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिह राजपूत व तेथिलच डी.बी.पथकाचे इंचार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या माध्यमातून मलकापूर शहरातील अनेक कुख्यात गुन्हेगारीला बराच आळा बसला आहे मलकापूर शहरातील अनेक गाडीच्या चोऱ्या,घरफोड्या,भांडणे,असे अनेक प्रकरनाणी शहरात तोंडवर काढले होते मात्र पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी बरेच प्रकरणे हाताळली व त्यापैकी अनेक गुन्ह्यांना वाचा सुद्धा फोडली आहे मलकापूर शहरातील जनतेकडून पोलीस निरीक्षक विजयसिह राजपूत व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांचे कौतुक केले जात आहे.