Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मलकापूर MIDC मधिल बेंझो केमिकल्स प्रकरण राजकीय हस्तक्षेपाने जोरदार तापले.


 मलकापूर प्रतिनिधी

मलकापूर तालुक्यातील बेंझो केमिकल कंपनी च्या सांडपाण्यामुळे आजूबाजूच्या 10 गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने काही शेतकरी वर्ग हा कांग्रेस नेते व ऍड.साहेबराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली हरित लवादात गेला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागून कंपनीवर दंडात्मक कारवाई झाली आहे. त्यामुळे कंपनी बंद पडणार की काय असा संभ्रम कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी व मजूर वर्गासमोर उभा ठाकला आहे. नेमके असे होऊ नये कंपनी चे स्थलांतर होऊ नये व परीसरातील कामगारांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळू नये या भावनेने माजी आमदार चैनसुख संचेती या रिंगणात उतरले. माजी आमदार चैनसुख संचेती यांचेकडून मलकापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी व विधितज्ञ यांचेवर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गंभीर आरोप केले. त्यानंतर विद्यमान आमदार  राजेश एकडे व ऍड.साहेबराव मोरे यांचे कडून पुन्हा माजी आमदार चैनसुख संचेती यांचेवर घणाघाती टीका करण्यात आली. आरोप-प्रत्यारोपांच्या या खेळामध्ये एवढे मात्र निश्चित की हे सर्व राजकीय पलटवार असल्याचे मतदार संघातील जनतेत बोलले जाते आहे.

  परंतु यात भरडल्या जात आहे ते संबंधित कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी,मजूर व कामगार तसेच त्या कंपनी मुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे ते शेतकरी व त्यांची शेती. हे प्रकरण असेच जर सातत्याने सुरू राहिल्यास यात नेमके काय होणार ?याचा विचार नेमका सत्ताधारी व माजी  लोकप्रतिनिधीं यांनी कधी केला आहे का ? तर याचे उत्तर सर्वसामान्यांच्या तोंडून नाही असेच येईल.सातत्याने दोन्हीही विरोधी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहतील व मतदार संघातील तसेच कंपनी मधील कर्मचारी, तसेच शेतकरी यांच्यातील वातावरण तणावपूर्ण होत राहील यात काही शंका नाही .यासाठी कोण येणार आणि कोण हे सगळे व्यवस्थित करून हे थांबवणार या दृष्टीने विचार करणे गरजेचे ठरते आहे. मात्र ज्यांना या प्रकरणाशी काही घेणे देणे नाही ते फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने या प्रकरणाकडे पाहत आहे तसेच या प्रकणात कोण कोणाला पलटी मारतो याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.यात खरे म्हणजे मलकापूर एमआयडीसी मधे बरेच प्रकल्प येण्या अगोदरच त्यांना पळवून लावण्याचे काम आपल्या मतदारसंघातील राजकारणी लोक सातत्याने करत असल्याची चर्चा मतदारसंघातील जनतेत होत असल्याचे दिसून येत आहे. 

  यात मरण होत आहे ते फक्त आणि फक्त मतदार संघातील बेरोजगार नवयुवक व येणाऱ्या  युवा पिढीचे. मात्र मतदार संघातील युवापिढीला आता जागरूक होण्याची वेळ या निमित्ताने आलेली आहे व आपण कोणत्याही नेत्यांच्या सांगण्या प्रमाणे किंवा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपले   व आपल्या परिवाराचे भले कशात आहे  हे पाहाणे महत्त्वाचे आहे. असा समज स्वतःचा करून घेने गरजेचे आहे. अन्यथा त्याच सतरंज्या उचलायला लागतील, तेच नेत्यांच्या मागे फिरावे लागेलं. यातच आपल्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय  पर्यायच उरणार नाही.