मलकापुर प्रतिनिधी
तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे करून तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळावी यासाठी वसंतराव भोजने शिवसेना जिल्हा प्रमुख बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार राजेश सुरडकर यांना शिवसेना, युवासेना, महिला आघाडी च्या वतीने आज दि.13 ऑक्टोबर रोजी निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, परतीच्या पावसामुळे मागील सप्ताहात मलकापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे तोंडाशी आलेले नगदी पीक सोयाबीन व मका पिकांचे अतोनात नुकसान झाले कापणीला आलेले सोयाबीन, कापणी केलेले सोयाबीन तसेच गंज लावून ठेवलेले सोयाबीन व कापणी करून शेतात पडलेला मका यांचे अतोनात नुकसान झाले आहे तरी त्वरीत सर्व्हे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी तसेच ज्या शेतकऱ्याने पिक विमा काढलेला आहे त्यांना पिक विमा मंजूर करून नुकसान भरपाई मिळावी नुकसान भरपाई न मिळाल्यास शिवसेनेच्या वतीने त्रिव आंदोलन करावे लागेल होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील, शहर प्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, युवा सेना शहर प्रमुख पवन गरुड, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश सुशीर, महिला आघाडी च्या नीताताई महाकाळे, कविताताई चौधरी,गिताताई दाभाडकर, रामभाऊ थोरबोले, शेख समद कुरेशी,यासीन कुरेशी, पांडुरंग चिम,बाळुभाऊ पोलाखरे, अर्जुन पाटील, अभिषेक राठोड, प्रवीण भारंबे, योगेश बावस्कर,अजय टप,गणेश पारस्कर, दुर्गेश सनीसे, प्रवीण भारंबे,मयुर ताटार, राजुभाऊ नेवे सह शिवसेना पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.