जिल्हा प्रतिनिधी
मलकापूर तालुक्यातील नॅशनल हायवे क्रमांक 6 वर 35 ते 40 बायो डिझेल पंप कायद्याचा धाक न बाळगता सुरू असल्याचे पहावयास मिळते. या सर्व प्रकारावर नियमित बातम्या प्रसारित होत असुन सुद्धा अधिकारी वर्ग या बायो डिझेल पंपावर कारवाई करण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसत आहे या बायोडिझेल प्रकरणात पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रत्येक वेळी सांगितले बायोडिझेल पंपावर कारवाई करण्यासाठी एका पथकाची नेमणूक करण्यात आली आहे मात्र हे पथक आहे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे हे पथक कागदोपत्री तर नाही ना ?
पुरवठा अधिकारी यांना या बाबत विचारणा केली असता कारवाई पथकाचे प्रमुख नायब तहसिलदार दराडे हे आहेत मात्र दराडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मी अश्या कुठल्याही पथकाचा प्रमुख नाही मी त्या बद्दल तालुकादंडाधिकारी यांना पत्र व्यवहार केलेला आहे . मात्र या विषयी असा प्रश्न उपस्थित होतो जो शासन निर्णयात सांगण्यात आले आहे तो शासन निर्णय आपल्या मलकापूर तालुक्यासाठी लागू होत नाही का?आणि जर लागू होत असेल तर पुरवठा अधिकारी यांनी सांगितले
ते कारवाई पथक नेमके कुठे आहे आणि त्या पथकाचा तक्रार नोंदविण्याचा नंबर प्रशासनाने जाहीर करावा अन्यथा मलकापुरातील अनेक सामाजिक संघटना या प्रकरणी काहीतरी आगळे वेगळे आंदोलन सुरू करण्याच्या मार्गावर दिसत आहेत .जे अवैध बायोडिझेल विना परवाना असतांना रस्त्यावर खुलेआम विकल्या जात आहे ते बायोडिझेल तयार करण्यासाठी कोणकोणते केमिकल आणि पदार्थ मिश्रित करण्यात येतात त्या गोष्टीकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे कारण यात एक नापटा नावाची पावडर मिश्रित केल्याजाते असे सर्वश्रुत आहे .
नेमकी ही पावडर या अवैध बायो डिझेल विक्रेता कडे येते कुठून हे सर्व लोक याच बायो डिझेल पासून लिक्विड बॉम्ब तयार करू शकतात या बायोडिझेल चा गैरवापर करून काही अनुचितकृत्य घडू शकत नाही का? कारण या बायोडिझेल चे अवैध काम आपल्या जिल्ह्यात परराज्यातील तडीपार असणारा आरोपी करत असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे .जर कुठली घटना घडल्यास त्या घटनेस कोण जवाबदार असेल हा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.सर्व गोष्टींची दखल जिल्हा प्रशासनाने घेणे गरजेचे ठरते आहे आता तरी जिल्हा प्रशासन बायोडिझेल पंपावर काय कारवाई करते का हे पाहणे गरजेचे झाले आहे ?