मलकापूर तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत हायवे ट्रॅप नजीक एका शेतात कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळल्याने मलकापूर तालुक्यात एकच खळबळ उडालेली आहे आज साडेचार च्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत हायवे ट्रॅप पोलीस चौकीच्या शेजारी 100 मीटर अंतरावर एक ढोरे चारणाऱ्या गुरख्याला एक अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने त्या गुराख्याने तिथे 100 मीटर हाकीच्या अंतरावर असणाऱ्या हायवे पोलीस चौकीवर पोलिसांना सांगितले हायवे पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन ला माहिती दिली.
तात्काळ एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले व तिथे कुजलेल्या मृतदेहाचा पंचनामा करीत पोलिसांनी तो मृतदेह मलकापूर उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आला आहे व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महाजन यांनी जनतेला त्या मृतदेहाची ओळख पटविण्याचा आव्हान केले आहे सदर मृत देहाच्या अंगावर पांढरी जीन्स पॅन्ट असून त्या मृत्त देहाची उंची साधारणतः अंदाजे साडेपाच फूट असून रंग गोरा सदर वर्णन आहे मृतदेह कुजलेल्याअवस्थेत आढळून आले असून सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचा आव्हाहन एमआयडीसी पोलीस यांच्या वतीने करण्यात आले आहे.