जिल्हा प्रतिनिधी
25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मसीस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधून शहरातील डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी तथा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णसेवा व रुग्णांना फळ वाटप करून मोठ्या उत्साहाने साजरा केला. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे फार्मासिस्ट आहे. जागतिक पातळीवर 25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. यामध्ये शहरातील डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय तथा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिवस निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे रुग्ण सेवा तथा रुग्णांना फळ वाटप करून अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल मालपाणी, यांच्या उपस्थितीत महाविद्यालय चे प्राध्यापक वृंद, विद्यार्थी तथा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मलकापूरचे फार्मासिस्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर उपक्रम हा प्रा. महेश नारखेडे, प्रा. रितेश पोपट अजय शर्मा यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. तसेच संपूर्ण सप्ताह फार्मसी सप्ताह म्हणून डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मलकापूर संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण, आरोग्य जनजागृती मार्च,आरोग्य तपासणी शिबिर, उद्योजकता व्याख्यान आयोजन करून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख यांनी दिली.