चिखली प्रतिनिधी
सविस्तर वृत्त असे की चिखली तालुक्यातील ग्राम गोदरी येथील शिवारावर भयानक अशा प्रकारची ढगफुटी झाली.विशेष म्हणजे 4 ते 5 तास मुसळधार पाऊस कोसळला पावसाची तिव्रता ऐवढी भयानक होती की, सर्व नदया छोटे,मोठे नाले पातळी सोडून शेतक-यांच्या अजुबाजुच्या पिकातून भयानक पणे ओसंडून वाहले.त्यामध्ये शेतक-यांचे उभे पिक उदवस्ती झाले,जमिनी खरडून गेल्या काही शेतक-यांच्या विहीरी गाळल्या,ढासाळल्या अनेक शेतक-याच्या शेतातील पाईप,तुषार,ठिबक संच वाहुन गेले,या व्यतीरिक्त महिणाभरापासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे कमजोर झालेली पिक वाहुन गेली,पिकाचे भरपुर प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतात पाणी साचले व पिके कुजली आहेत.
एकंदरीत झालेले नुकसान हे खुप भयानक आहे. प्रशासनाने सदर नुकसानीचा तात्काळ पंचानामा करुन सर्व शेतक-यांना आर्थीक मदत दयावी.प्रशासनाच्या अति वृष्टीबाबत कुठल्याही तांत्रीक अडचणी पुढे करून शेतक-यांना आर्थीक मदत जाहीर करण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविल्यास आम्ही सर्व शेतकरी लोकशाही मार्गाने प्रशासनाच्या विरोधात तिव्र अंदोलन छेडू व होणा-या परिणामास प्रशासन जबाबदार राहाल असे याचे निवेदन चिखली तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले त्यावेळी गोदरी ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच भरत जोगदंडे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी भिका खरे, अशोक सुरडकर,गणेश देशमुख, विठ्ठल परिहार,भास्कर मोळवंडे, विजय शेळके,संतोष कोथळकर,रतन परिहार,दिपक सुरडकर,विठोबा परिहार,विनोद भवर,मधुकर दहिकर,विजय सुरोशे,सुनील देशमुख,संजय अहिरे,प्रमोद मुळे,संतोष परिहार, मंगेश मोळवंडे सह अनेक गावातील मंडळी उपस्थित होते